पेरणीचा दाखला

पेरणी करणाऱ्याचा दाखला . मतय १३ : -

जेव्हा नगर नगर मधून लोकांची गर्दी त्याच्याकडे येत होती तेव्हा त्याने त्यांना एक दाखला सांगितला , एक शेतकरी आपले बी पेरण्यासाठी गेला त्याने जेव्हा बी पेरले तेव्हा काही बी वाटेवर पडले व ते पायाच्या खाली तुडविले गेलेकाही बी काट्यांमध्ये पडले ते वाढले परंतु काट्यांमुळे दाबले गेले . काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगविले व शंभर पट्ट पेक्षा अधिक फळ आले ह्या गोष्टी सांगत असता मोठया आवाजाने सांगितले , ज्यांच्या जवळ ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे त्यांच्या शिष्यांनी त्याला विचारले या दाखल्याचा अर्थ काय आहेतो त्यांना म्हणाला , परमेश्वरच्या राज्याविषयी रहस्य जाणून घेण्याचेतुम्हला दिले आहे . परंतु दुसऱ्यांना दाखल्याद्वारे दिले आहेत . ह्यासाठी की त्यांना दिसत असता पाहू नये व ऐकत असता समजू

नये . या दाखल्याचा अर्थ असा आहे बी परमेश्वराचे वचन आहे . जे बी वाटेवर पडले होते ते हे व्यक्ती आहेत की वचन ऐकतात तेव्हा सैतान येऊन त्यांच्या मनातून वचन काढून घेतो . यासाठी की ते विश्वास करू नये व त्यांचे तारण होऊ नये . जे बी खडकाळ जमिनीत पडले ह्याचा अर्थ हा आहे जे व्यक्ती जेव्हा वचन ऐकतात व आनंदाने ग्रहण करतात परंतु त्यांचा विश्वास मजबूत नसतो . म्हणून ते काही वेळापर्यंत विश्वास करतात व परीक्षा आली की विश्वास करत नाही . व जे बी काट्यामध्ये पडले आहेत त्यांचा अर्थ हा आहे की जे व्यक्ती वचन ऐकतात परंतु जेव्हा ते आपल्या वाटी जातात , तेव्हा चिंता धन दौलत व जीवनातील सुख दुख ह्यांच्यात दाबून जातात . त्यांच्या वर पक्के फळ येत नाही . व चांगल्या जमिनीवर पडलेले बी ह्याचा अर्थ हा जे व्यक्ती जे चांगल्या व खऱ्या मनाने वचन ऐकतात . त्याला ते ग्रहण पणकरतातपुन्हा ते आपल्या धीराने फळ देतात .