१ दहा कुवारीचा दाखला

दहा कुवारींचे दाखला मतय २५ :१-३४

तेव्हा स्वर्गाच्या राज्याची तुलना त्या दहा कुवारींबरोबर केला जाईल जे आपले दिवे घेऊन आपल्या नवऱ्याला भेटायला निघाल्या . त्याच्यामध्ये पाच मूर्ख आणि पाच हुशार होत्या . कारण मूर्ख कुवारिनी दिवा घेतला परंतु आपल्याबरोबर तेल घेतले नाही . पण ज्या हुशार होत्या त्यांनी आपल्या दिव्याबरोबर बाटलीत तेल पण घेतले . जेव्हा नवऱ्यालाल यायला उशीर झाला होता तेव्हा ते सगळे झोपून गेले . पण अर्ध्या रात्रीला हाक मारली की पाहा नवरा येत आहे तुम्हाला भेटण्यासाठी चला . तेव्हा त्या सगळ्या कुवारी येऊन बसल्या आणि आपापले दिवे व्यवस्थित करू लागल्या . आणि मूर्ख होत्या त्या हुशार होत्या तींना म्हणाल्या आम्हाला पण तुमच्या तेलामाधील थोडस तेल दया कारण आमचे दिवे आता विझून जाणार आहेत . पण हुशार होत्या त्यांनी उत्तर दिले नाही हे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी पुरणार नाही . चांगले होणार की तुम्ही दुकानदाराकडे जाऊन तेल विकत आणावे . जेव्हा ते विकत घ्यायला निघुन गेले तेव्हा नवरा येऊन गेला आणि ज्या तयारीत होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नात निघुन गेल्या तेव्हा दरवाजा बंद करून दिला . नंतर ते मूर्ख कुवारी येऊन सांगायला लागल्या मालिक , आमच्यासाठी पण दरवाजा उघडुन दे . पण त्याने उत्तर दिले मी तुम्हाला खरच सांगतो मी तुम्हाला ओळखत नाही . त्यामुळे जागे राहा कारण तुम्हाला तो दिवस व तो समय पण माहित नाही कि येशूचे दुसरे आगमन होणार आहे . . मग हे त्या माणसासारखे आहे जो प्रवासात जाणार होता आणि ज्याने आपल्या नोकराला बोलावून आपली संपती सोपवून दिली . त्याने एकाला पाच हजार , दुसऱ्याला तीन हजार व तिसऱ्याला एक हजार म्हणजे प्रत्येकाच्या लायकीप्रमाणे दिले आणि प्रवासात निघुन गेला . ज्याला पाच हजार रुपये दिले त्याने लगेच जाऊन व्यापार केला आणि त्याच्याने पाच हजार अजून मिळविले ह्याप्रमाणे ज्याला दोन रुपये दिले होते त्याने पण असेच दोन रुपये अजून कमविले . पण ज्याला एक हजार रुपये मिळाले होते त्याने जाऊन जमीन खोदिली आणि आपल्या मालकाने दिलेला रुपया त्याच्यात लपवून ठेवला . खूप दिवसांनी नंतर त्या नोकरांचा मालक आला . आणि आणि त्यांचा हिशोब घ्यायला लागला” तेव्हा ज्याला पाच रुपये मिळाले होते त्याने अजून पाच आणून दिले आणि म्हटले , “ मालिक , तू मला पाच रुपये दिले होते , बघा त्याच्याने मी अजून पाच रुपये कमाविले” . त्याच्या मालकाने सांगितले , शाब्बास , माझ्या चांगल्या , विश्वासु नोकरा , तू थोडक्या गोष्टीवर विश्वास योग्य राहिला , मी तुला पुष्कळ वस्तुवर अधिकारी बविणार . आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो . नंतर ज्याला दोन हजार रुपये मिळाले होते तो नोकर येऊन म्हणाला , मालिक , तू मला दोन हजार रुपये दिले होते , बघा मी त्याच्यावर अजून दोन हजार रुपये कमविले” . मालीकाने त्याला सांगितले , “ शाब्बास , चांगल्या आणि विश्वासयोग्य नोकरा , तू थोडक्या गोष्टीवर विश्वास योग्य राहिला , मी तुला पुष्कळ वस्तूंचा अधिकारी बनविणार . आपल्या मालीकाच्या आनंदात सहभागी हो” . नंतर ज्याला एक रुपया मिळाला होता तो आपल्या आपल्या मालकाला येऊन म्हणाला , “ हे मालिक , मला माहित होते की , तू कठोर माणूस आहे , जिथे पेरणी करत नाही तेथे कापणी करतात” . आणि जिथे उधळत नाही तिथे गोळा करतात . शेवटी मी घाबरून गेलो आणि तुझ्या रुपयाला मी जमिनीत लपवून दिले , पाहा , जे तुझे आहे ते घेऊन घे . पण त्याच्या मालकाने उत्तर दिले , ‘ अहो दुष्ट व आळशी नोकरा , तुला हे ठाऊक होते की जिथे मी पेरणी करत नाही तिथे मी कापतो आणि जिथे पसरून ठेवले नाही तेथुन गोळा करतो . तर मग माझे धन मला सावकाराकडे ठेवायला पाहिजे होते , म्हणजे मी आल्यावर मला व्याजासकट परत मिळाले असते . तर याच्याकडून ते हजार रुपये घ्या आणि ज्याच्याकडे दहा हजार आहे त्याला देऊन दया . कारण प्रत्येक ज्याच्याकडे आहे त्याला आजून देण्यात येइल आणि त्याच्या कडे खूपच होऊन जाईल पण ज्याच्या जवळ नाही त्याच्या कडून ते पण घेतले जाईल जे त्याच्याकडे आहे . या बिनकामाच्या नोकराला बाहेरच्या अंधारात टाकून दया . जिथे रडायचे आणि दात चावायचे आहे . पण मनुष्याचा मुलगा आपल्या गौरवात येणार आणि सगळे देवदूत पण त्याच्या बरोबर येणार तेव्हा तो आपल्या महिमय राजासनावर बसणार आणि सगळ्या जाती त्याच्या समोर एकत्र करण्यात येईल आणि तो त्यांना एक दुसऱ्या कडून वेगळा करील . जसा मेंढपाळ बकऱ्याना मेंढरापासुन वेगळा करतो . तो मेंढराना आपल्या उजवीकडे आणि बकऱ्यांना डावीकडे करेल . तेव्हा राजा आपल्या उजव्या हाताकडच्याना म्हणेल , हे माझ्या पिताच्या धन्य माणसांनो , या , त्या राज्याचे अधिकारी बना . जो जगाच्या सुरवातीपासून तुमच्यासाठी बनविला आहे .